Chakan Crime: कंपनीतील कामाचे काँन्ट्रॅक्ट मिळविण्यावरून वाद; जीवे मारण्याची धमकी देत मागितली 50 हजारांची खंडणी

एमपीसी न्यूज – कंपनीतील कामाचे काँन्ट्रॅक्ट मिळविण्याच्या कारणावरून तिघांनी एका व्यावसायिकासोबत वाद घातला. तसेच व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडे 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. ही घटना निघोजे येथील स्कोडा व्ही. डब्ल्यू. कंपनीत घडली.

दत्तात्रय मारुती बेंडाले (वय 45, रा. बेंडले वस्ती, निघोजे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी जालिंदर बेंडले, चंद्रकांत बेंडले, तानाजी बेंडले (सर्व रा. निघोजे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी दत्तात्रय यांना निघोजे येथील स्कोडा व्ही. डब्ल्यू. कंपनीमध्ये खोदकाम करण्याचे काम मिळाले होते. ते काम मिळविण्यासाठी आरोपींनी यापूर्वी प्रयत्न केले होते. मात्र, ते काम आरोपींना मिळू शकले नाही. कंपनीत खोदकाम करत असताना आरोपींनी फिर्यादी दत्तात्रय यांन फोन करून कंपनीत काम न करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली.

तरीही फिर्यादी यांनी त्यांचे काम सुरूच ठेवले. त्यामुळे आरोपी कंपनीच्या आवारात विनापरवाना प्रवेश करून फिर्यादी यांना त्रास देऊ लागले. आरोपींनी पोकलंड, हायवा आणि डंपर कंपनीत पार्क करून फिर्यादी यांना काम करण्यास प्रतिबंध केला.

कंपनीत काम करायचे नाही म्हणत फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादी यांच्या घराकडे जाणारा सामायिक रस्ता आरोपींनी जेसीबीच्या सहाय्याने खोडून फिर्यादी यांना घरी जाण्या-येण्यास मज्जाव केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.