Hinjawadi Crime : भुजबळ चौकातून अवघ्या 20 मिनिटात मोपेड दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज – वाकड येथील भुजबळ चौकातील सर्विस रोडवरून अज्ञात चोरट्यांनी एक मोपेड दुचाकी चोरून नेली. हा प्रकार रविवारी (दि. 25) दुपारी पाच ते सव्वा पाच वाजताच्या सुमारास घडला. अवघ्या 20 मिनिटात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली आहे.

अजित रामान पवार (वय 30, रा. धायरी, पुणे) यांनी याबाबत रविवारी (दि. 25) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची पाच हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एम एच 12 / जी वाय 3284) भुजबळ चौकाशेजारी सर्विस रोडवर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी केवळ 20 मिनिटांमध्ये दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.