Dehuroad Corona Update : कॅंटोन्मेंट हद्दीत आज पाच रुग्णांना डिस्चार्ज ; नव्या रुग्णवाढीला ब्रेक
एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मोठ्याप्रमाणात घट होत असताना आज, शुक्रवारी एकाही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली नाही. उलट कोरोनावर मात केलेल्या पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती कॅंटोन्मेंट प्रशासनाकडून देण्यात आली.
कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस दिला आहे. या अहवालानुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1308 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आजपर्यंत एकूण 1259 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
तर होम आयसोलेशन मधील रुग्णांची संख्या 10 असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये आज एकही रुग्ण उपचारासाठी दाखल नाही, तर हद्दीत 14 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 4 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्या