Pimpri crime News : रेल्वेखाली सापडून अनोळखी व्यक्‍तीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – धावत्या रेल्वेखाली सापडून अनोळखी व्यक्‍तीचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 8) सकाळी पिंपरी रेल्वे स्टेशनजवळ घडली.

पिंपरीचे रेल्वे पोलीस मिलिंद गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेखाली सापडून एका अनोळखी व्यक्‍तीचा मृत्यू झाला.

मयत व्यक्‍तीचे वय अंदोज 45 ते 50 वर्ष आहे. मृत व्यक्ती अंगाने मध्यम, चेहरा गोल, उंची पाच फूट 3 इंच, दाढी सफेद असे वर्णन आहे. तसेच अंगात सफेद रंगाचा फूल बाह्यांचा शर्ट आणि राखाडी रंगाची पॅन्ट घातलेली आहे.

या व्यक्‍तीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पिंपरी रेल्वे पोलीस चौकीशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस हवालदार मिलिंद गायकवाड यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.