Nashik News: पाथर्डीजवळ ट्रॅक्टरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – ट्रॅक्टरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाला. ही दुर्घटना पाथर्डीजवळ काल (सोमवारी) संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भालचंद्र शंकर कोंबडे (वय 65, पाथर्डी गाव कोंबडे नगर ) रात्री पावणेसात वाजेच्या सुमारास दुचाकीने (क्रमांक एम एच 15 बिबी 85 79 ) पाथर्डी गावाकडून कोंबडे मळ्याकडे चालले होते. याच वेळी समोरून आलेल्या ट्रॅक्टरने कोंबडे यांना जोरदार धडक दिली. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास व पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.