Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी 4,092 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
एमपीसी न्यूज – राज्यात रविवारी देखील उच्चांकी रुग्ण वाढ झाली. दिवसभरात राज्यात 4 हजार 092 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. तसेच, 1 हजार 355 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 19 लाख 75 हजार 603 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यापैकी आज 1 हजार 355 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात आज 4092 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 1355 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1975603 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 35965 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.7% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 14, 2021
राज्यात सध्या 35 हजार 965 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.49 टक्के एवढा आहे तर, रिकव्हरी रेट 95.70 टक्के एवढा झाला आहे.