Corona Vaccination : दोन महिन्यात तीन कोटी 29 लाख लोकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

एमपीसी न्यूज – देशात 16 जानेवरी 2021 रोजी कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. आज लसीकरण कार्यक्रमाला 60 दिवस पूर्ण होत आहेत. 60 दिवसांत आत्तापर्यंत 3 कोटी 29 लाख 47 हजार 432 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार,  (15 मार्च, रात्री 7 वाजेपर्यंत) 3 कोटी 29 लाख 47 हजार 432 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. त्यापैकी 74 लाख 08 हजार 521 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर, 43 लाख 97 हजार 613 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

74 लाख 26 हजार 479 फ्रन्ट लाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर, 13 लाख 23 हजार 527 फ्रन्ट लाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील सहव्याधी असलेल्या 16 लाख 96 हजार 497 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच, 60 वर्षावरील 95 लाख 19 हजार 024 ज्येष्ठ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवक आणि कोरोना योद्ध्यांना लस देण्यात आली. 1 मार्च पासून लसीकरण कार्यक्रमाचा दुसरा टप्पा सुरू झाला. यामध्ये 60 वर्षावरील सर्व आणि 45 वर्षावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्रावर लस दिली जात असून ऑनलाईन माध्यमातून यासाठी नोंदणी केली जाऊ शकते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.