Dehuroad News : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या सायकलपटूचा गौरव

एमपीसीन्यूज : पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी झटणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार विजेते सायकलपटू शाम चौहान यांच्यासह द्रुव चौहान आणि प्रेरणा चौहान यांचा देहूरोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद गज्जेवार यांच्या हस्ते आज, शनिवारी गौरव करण्यात आला.

माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

देहूरोड सिटी पोलीस चौकी येथे झालेल्या कार्यक्रमात प्रसाद गज्जेवार यांच्या हस्ते या पर्यावरण प्रेमींना गुलाबाचे फुल, स्टीलची पाणी बॉटल आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक कुणाल कोकडवार, उद्योजक आशिष बन्सल, कोविड समर्पित पथकाचे के. पी. ऍडम, मंगेश पोडाला उपस्थित होते.

पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सायकलपटू शाम चौहान यांनी देहूरोड ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास केला होता. तसेच दरवर्षी आषाढी वारीसाठीही ते देहू ते पंढरपूर दरम्यान सायकल वारी करीत पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचे कार्य करतात.

त्यामुळे आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माहिती अधिकार कार्यकर्ते रमेशन यांनी त्यांचा अनोख्या पद्धतीने गौरव केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.