Pune News : डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली अतिवृष्टीबाधित गावांची पाहणी

एमपीसी न्यूज – विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नांदगाव, कंकवाडी व कोंढरी गावांची व शेतीची प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. तसेच प्रशासनाकडून करीत असलेल्या उपाययोजना बाबत माहिती घेत ग्रामस्थांकडून स्थानिक परिस्थितीबाबत अडीअडचणी जाणून घेतल्या.

यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील, नांदगावचे सरपंच युवराज कुडले, कंकवाडीचे सरपंच मुक्ताबाई पवार, कोंढरीचे सरपंच भारती कोंढाळकर यांच्यासमवेत संबंधीत विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी नांदगाव, कंकवाडी, कोंढारी येथे शासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या पंचनाम्याची माहिती घेतली. त्यांनी अतिवृष्टीमुळे ज्या घरांचे, शेतीचे नुकसान झाले त्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करणाच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यांनी संबंधितांना दिल्या.

कंकवाडी गावातील झालेल्या शाळेच्या इमारतीच्या नुकसानीची पाहणी करत शाळेतील पुस्तके, संगणक लॅब यासारख्या पायाभूत सुविधांच्या उभारणी करीता तात्काळ निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

कोंढरी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू
घाबरु नका, शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे, ग्रामस्थांना दिला आधार

कोंढरी ग्रामपंचायतने संपूर्ण पुनवर्सनाबाबत ग्रामसभा घेवून शासनाकडे ठराव सादर करावा. त्यादृष्टीने शासनस्तरावर पाठपुरावा करून पुनवर्सनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी ग्रामस्थांना दिले.

कोंढरी गावातील दरडप्रवण क्षेत्राची पाहणी करत गाडगीळ समितीने दिलेल्या अहवालानुसार दरवर्षी दरड कोसळण्याच्या कारणांचा शोध घेणार असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.