Maharashtra Corona Update : राज्यात आज तीन हजारांहून कमी रुग्ण, 3,836 डिस्चार्ज
एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (सोमवारी) तीन हजारांहून कमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, 3 हजार 836 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या कमी झाली असून, सध्या 41 हजार 672 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 65 लाख 24 हजार 498 झाली आहे. त्यापैकी आजपर्यंत एकूण 63 लाख 40 हजार 723 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.18 टक्के एवढे झाले आहे.
#Maharashtra #COVID19 Updates for today
*⃣New Cases- 2,583
*⃣Recoveries- 3,836
*⃣Deaths – 28
*⃣Active Cases – 41,672
*⃣Total Cases till date – 65,24,498
*⃣Total Recoveries till date – 63,40,723
*⃣Total Deaths till date – 1,38,546
*⃣Tests till date – 5,71,64,401(1/4)🧵
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) September 20, 2021
राज्यात आज 28 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 1 लाख 38 हजार 546 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.
राज्यात आजपर्यंत 5 कोटी 71 लाख 64 हजार 401 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 75 हजार 736 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत, तर 1 हजार 677 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.