Pune News : तुम्हाला लोकलने प्रवास करायचाय ! मग ही प्रक्रिया पूर्ण करा

एमपीसी न्यूज – कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी होत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. रेल्वेच्या विविध गाड्यांसह लोकल रेल्वेच्या फे-या देखील वाढवल्या जात आहेत. परंतु लोकल प्रवासासाठी शासनाने काही अटीशर्ती घालून दिल्या आहेत. त्या पूर्ण केल्यास तुम्हाला लोकल रेल्वेने प्रवास करता येणार आहे.

कोरोनानंतर राज्यातील शाळा, महाविद्यालये पुन्हा गजबजू लागली आहेत. शासनाकडूनन 18 वर्षांखाली विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा दिली जाणार आहे. मात्र 18 वर्षांपुढील प्रत्येकाला ई-पास जनरेट करावा लागेल. ई-पास असेल तरच रेल्वेचे तिकीट अथवा पास मिळणार आहे.

रेल्वे तिकीट तपासनीस यांना लसीकरण पूर्ण झाल्याचे नमूद केलेले ओळखपत्र तपासण्याचा अधिकार आहे. ज्या प्रवाशांकडे असे ओळखपत्र नसेल किंवा प्रवाशांकडून खोटे ओळखपत्र आढळल्यास संबंधितांवर 500 रुपये आर्थिक दंड आणि भारतीय दंड संहिता 1860 नुसार कारवाई केली जाणार असल्याचे आदेश राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत.

असा जनरेट करा लोकल प्रवासासाठी ई पास –

https://epassmsdma.mahait.org या संकेतस्थळास भेट द्या.

तिथे चार पर्याय दिसतील. त्यातील Universal For Double Vaccinated Citizens या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर मोबाईल क्रमांक देण्याचा पर्याय येईल. त्यामध्ये तुमच्या कोरोना लसीकरणासाठी दिलेला मोबाईल क्रमांक भरा आणि send OTP यावर क्लिक करा.

त्यानंतर खाली आणखी एक OTP भरण्यासाठी पर्याय येईल. तुम्ही वरती दिलेल्या मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड (ओटीपी) येईल. त्यावर आलेला OTP भरा आणि Submit या पर्यायावर क्लिक करा.

आता तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल क्रमांक, संदर्भ क्रमांक, दुस-या डोसची तारीख अशी माहिती दिसेल. त्यातच Generate Pass हा पर्याय येईल. त्यावर क्लिक करा.

आता तुम्हाला तुमचे नाव आणि लस घेतल्याची दिनांक असा सर्व तपशील दिसेल. त्याखाली Choose File हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुमचा फोटो अपलोड करा.

त्यानंतर Apply या पर्यायावर क्लिक करा.

ही प्रक्रिया केल्यानंतर पुढील 24 तासात तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे एक लिंक प्राप्त होईल. लिंक आल्यानंतर ती उघडून ई पास मोबाईलमध्ये सेव्ह करा.

हा Universal Pass रेल्वे स्थानकावर दाखवल्यानंतर तुम्हाला रेल्वेचा पास मिळवता येईल. कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण होऊन 14 दिवस झाले नसतील. तर तुम्हाला OTP टाकल्यानंतर तुम्हाला पुढे प्रोसिड करता येणार नाही.

तुम्ही कोरोना लसीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झाले असतील, तर तुम्ही लोकल प्रवास करू शकता.

दरम्यान, अनलाॅक प्रकियेच्या नव्या नियमांअंतर्गत पुणे-लोणावळा मार्गावर लोकलच्या फे-यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामध्ये पुणे-लोणावळा मार्गावर सात, लोणावळा-पुणे मार्गावर सात, तर तळेगाव-पुणे आणि पुणे-तळेगाव मार्गावर प्रत्येकी एक लोकल रेल्वे सुरु करण्यात आली आहे.

लोकल रेल्वेचे अपडेटेड टाईमटेबल –

पुणे – लोणावळा

  • लोकल क्रमांक (01486) पुणे स्थानकावरून 06.30 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 07.50 वाजता पोहोचेल.
  • लोकल क्रमांक (01482) पुणे स्थानकावरून 08.05 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 09.25 वाजता पोहोचेल.
  • लोकल क्रमांक (01586) पुणे स्थानकावरून 08.57 वाजता सुटेल. तळेगाव स्थानकावर 09.47 वाजता पोहोचेल.
  • लोकल क्रमांक (01566) पुणे स्थानकावरून 15.00 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 16.20 वाजता पोहोचेल.
  • लोकल क्रमांक (01488) पुणे स्थानकावरून 16.25 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 17.45 वाजता पोहोचेल.
  • लोकल क्रमांक (01484) पुणे स्थानकावरून 18.02 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 19.27 वाजता पोहोचेल.
  • लोकल क्रमांक (01574) पुणे स्थानकावरून 19.05 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 20.30 वाजता पोहोचेल.
  • लोकल क्रमांक (01494) पुणे स्थानकावरून 20.00 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 21.30 वाजता पोहोचेल.

 लोणावळा – पुणे

  • लोकल क्रमांक (01493) लोणावळा स्थानकावरून 06.30 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 07.55 वाजता पोहोचेल.
  •  लोकल क्रमांक (01481) लोणावळा स्थानकावरून 08.20 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 09.45 वाजता पोहोचेल.
  • लोकल क्रमांक (01587) तळेगाव स्थानकावरुन 09.57 वाजता सुटेल. पुणे स्तानकावर 10.50 वाजता पोहोचेल.
  • लोकल क्रमांक (01485) लोणावळा स्थानकावरून 10.05 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 11.25 वाजता पोहोचेल.
  • लोकल क्रमांक (01565) लोणावळा स्थानकावरून 17.30 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 16.50 वाजता पोहोचेल.
  • लोकल क्रमांक (01483) लोणावळा स्थानकावरून 18.20 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 19.45 वाजता पोहोचेल.
  • लोकल क्रमांक (01487) लोणावळा स्थानकावरून 19.35 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 20.55 वाजता पोहोचेल.
  • लोकल क्रमांक (01573) लोणावळा स्थानकावरून 20.40 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 22.00 वाजता पोहोचेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.