Urban Cell : सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी राष्ट्रवादी अर्बन सेल सज्ज – खासदार वंदना चव्हाण
एमपीसी न्यूज : मध्यवर्ती कार्यालय पिंपरी (Urban Cell) येथे सोमवार दिनांक १० ऑक्टोंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्बन सेल ‘नूतन कार्यकारिणी व नियुक्ती पत्र वाटप’ अर्बन सेल प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार ॲड. वंदना चव्हाण यांच्या शुभहस्ते देण्यात आले. तसेच शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे, महिला निरीक्षक शितल हगवने, तसेच महिला अध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.