Pimpri News : महिलेचे एटीएम कार्ड चोरून पाच तासात खात्यातून काढले दोन लाख
एमपीसी न्यूज – महिलेचे एटीएम कार्ड हातचालाखीने चोरून त्याद्वारे सुमारे दोन लाख रुपये काढले आहेत. हा प्रकार पिंपरी गाव येथे मंगळवारी (दि.10) सकाळी (Pimpri News) अकरा ते दुपारी चार या कालावधीत घडला.याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली असून अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune News : ‘मिलाप करंडक 2023’ पुरस्कार नगीनदास खंडवाल व मामासाहेब मोहोळ महाविद्यालयांनी पटकावला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी पिंपरी गाव येथील एटीएम मशीन मधून काही रक्कम काढली व त्या बाहेर पडत असताना अज्ञात इसमाने त्यांचे एटीएम हात चालाखीने चोरी केले व सकाळी अकरा ते सायंकाळी चार या पाच तासाच्या कालावधीत पाच वेळा कॅश विड्रॉल करून (Pimpri News) 1 लाख 97 हजार 500 रुपये काढून घेतले, यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.