Today’s Horoscope 10 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 10 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग –
वार – शुक्रवार.
10.03.2023.
शुभाशुभ विचार- 09 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – चित्रा.
चंद्र राशी- कन्या 18.37 पर्यंत नंतर तूळ.
—————————————-
मेष – ( शुभ रंग- तांबडा )
नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रयत्नांना आज नशिबाची साथ नक्की लाभेल.
वृषभ (शुभ रंग- हिरवा )
आज तुम्ही मुलांचे वाढते हट्ट हौशीने पुरवाल. आपल्या कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटणारी अशी एखादी कामगिरी तुमच्या हातून होईल. मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष पुरवा.
मिथुन ( शुभ रंग- लेमन )
तुमच्या सामाजिक प्रतिश्ठेत वाढ होईल आज घरात सज्जनांची उठबस राहील. गृहिणी स्वतःचे छंद जपतील. जमाखर्चाचा तराजू समतोल राहील. गृह सौख्याचा दिवस.
कर्क (शुभ रंग- गुलाबी)
एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आज वणवण भटकावे लागण्याची शक्यता आहे. गृहिणी शेजार धर्म पाळतील. जवळपासच्या प्रवासात काही फायदेशीर ओळखी होतील.
सिंह (शुभ रंग- डाळिंबी )
धनस्थानातील चंद्रभ्रमण आर्थिक आवक वाढवेल. सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. गृहिणी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतील. छान दिवस.
कन्या ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज खिशात पैसा खेळता असल्याने तुमची मनस्थिती उत्तम असेल. इतरांना दिलेले शब्द आवर्जून पाळाल. तुमच्यातील सकारात्मकता इतरांस प्रभावित करेल.
तूळ ( शुभ रंग- जांभळा)
आज तुम्ही काहीसे लहरीपणे वागाल. घाई गर्दीत घेतलेले निर्णय चुकतील. तरुणांना आज प्रलोभने आकर्षित करतील. आज थोडा संयम बाळगण्याची गरज आहे.
वृश्चिक (शुभ रंग- जांभळा)
आज हार्डवर्क न करता स्मार्टवर्क करण्याकडे तुमचा कल राहील. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीने ही तुम्ही भारावून जाल.मोठेपणा घेण्यासाठी न परवडणारा खर्च ही कराल.
धनु- (शुभ रंग- निळा)
आज आपले कर्तव्य सोडल्यास इतर कोणत्याही गोष्टीला तुम्ही कमी महत्त्व द्याल. नोकरदारांना प्रमोशनची चाहूल लागेल. आज स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल.
मकर ( शुभ रंग- मरून )
आज तुमच्या प्रयत्नांना दैवाची साथ शंभर टक्के राहील नोकरीत असाल तर साहेबांची कृपादृष्टी असेल. नास्तिक मंडळीही आज गरजे पुरती श्रद्धाळू होतील.
कुंभ (शुभ रंग – आकाशी)
जे चाललाय ते बरच चाललंय म्हणा. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह धरू नका. धाडसाची कामे आज टाळलीत तर बरे होईल. आज तुम्हाला सासुरवाडी कडून एखादा लाभ होऊ शकतो.
मीन -(शुभ रंग – पांढरा )
वैवाहिक जीवनात सामंजस्य असेल. जोडीदाराला दिलेले शब्द पाळाल. व्यावसायिकांचे भगिदारांशी एकमत राहील. इतरांच्या भानगडीत डोकाऊ नका.