Talegaon Dabhade : महिलांनो, आरोग्याकडे जास्त लक्ष द्या – सिद्धार्थ चांदेकर

एमपीसी न्यूज – महिलांनी आरोग्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायला हवे. महिला सुदृढ (Talegaon Dabhade) बनल्या तर भारत सुदृढ बनणार आहे. त्यामुळे महिलांनो, आरोग्याकडे लक्ष द्या, असा सल्ला प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने रोटरी सिटी या रॅलीच्या आयोजित कार्यक्रमप्रसंगी दिला.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद अंको लाईफ कॅन्सर सेंटर व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या फाईट अगेन्स कॅन्सर “रोटरी सिटी पिंकेथॉन” या जनजागृती रॅलीस प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हे उपस्थित होते.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम घेण्यात आल्याचे रोटरी सिटीचे अध्यक्ष दीपक फल्ले यांनी सांगितले.

 

 

रॅलीच्या सुरुवातीला माझी वसुंधरा याची सर्वांना शपथ देण्यात आली व कॅन्सरसाठी जनजागृती करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या व या रॅलीचा शुभारंभ प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर रोटरीचे जिल्हा संचालक नितीन ढमाले यांच्या शुभहस्ते व तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, अँको लाइफ कॅन्सर सेंटरचे डॉ मनोज तेजानी,दिलीप पारेख,विलास काळोखे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

 

Pune News : पुण्यातील अहिरे गावातील बिबट्या अखेर जेरबंद

 

कॅन्सर विरोधी लढ्यामध्ये आपण सर्वांनी हातात हात घालून काम केले पाहिजे असे प्रतिपादन मुख्याधिकारी  विजयकुमार सरनाईक यांनी केले तर जिल्हा संचालक रोटरियन नितीन ढमाले यांनी रोटरी डिस्ट्रिक्टकडून कॅन्सर जनजागृतीसाठी रोटरी सिटीला सहकार्य केले जाईल असे प्रतिपादन केले.
सदर रॅलीमध्ये 1000 पेक्षा अधिक महिलांनी भाग घेऊन प्रचंड प्रतिसाद दिला या रॅली प्रसंगी डॉ अजय ढाकेफळकर,सुरेश शेंडे,किरण ओसवाल,संजय मेहता,सुनंदा वाघमारे हे प्रमुख उपस्थित होते. सर्व महिलांसाठी पंधरा लकी ड्रॉ काढण्यात आले यामध्ये “संकेत मानाची पैठणी” सौ वैशाली थोरात यांना मिळाली.
याप्रसंगी थाय बॉक्सिंग मध्ये संपूर्ण देशात मावळ तालुक्याचे नाव उज्वल करणारी तृप्ती निंबळे हीचा विशेष सन्मान करण्यात आला तर कॅन्सर सारख्या रोगावर मात करणाऱ्या काही महिलांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा फडतरे यांनी केले तर प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख डॉक्टर धनश्री काळे यांनी केले. आभार शाहीन शेख यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरयू देवळे,प्रदीप मुंगसे,डॉ विद्या पोतले, संतोष परदेशी,प्रशांत ताये,प्रदीप टेकवडे,आनंद पूर्णपात्रे,राजेंद्र कडलक, संजय चव्हाण, अविनाश नांगरे, वैभव तनपुरे, हर्षद झव्हेरी व सर्व रोटरी (Talegaon Dabhade) सदस्य यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.