Nigdi : तडीपार आरोपीला शस्त्रासह अटक
एमपीसी न्यूज – तडीपार आरोपीला निगडी पोलिसांनी शस्त्रासह अटक केली (Nigdi) आहे. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी (दि.27) सायंकाळी यमुना नगर निगडी येथे केली आहे.
लक्ष्मण उत्तरेश्वर उबाळे (वय 22 रा.ओटास्किम निगडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. तरीही आरोपी याने नियमाचा भंग करत हद्दीत प्रवेश केला.
Pimpri : महर्षी वाल्मिकी विचार प्रबोधन पर्वात 46 सफाई कर्मचा-यांचा सत्कार
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ हत्यार देखील मिळाले. निगडी पोलिसांनी आरोपीला अटक करत (Nigdi) त्याच्यावर बेकायदा शस्त्र बाळगल्याचा व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) (3) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.