Pimple Gurav : पिंपळे गुरव येथे तरुणावर कोयत्याने जिवघेणे वार, दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज –  पिंपळे गुरव येथे एका 28 वर्षीय तरुणावर (Pimple Gurav)  दोघांनी कोयत्याने जीवघेणे वार केले आहेत. हा सारा प्रकार बुधवारी (दि.1) पहाटे पिंपळे गुरव येथील मयुर नगरी फेज-1 येथे घडला आहे.

प्रतिक प्रदिप सरोदे (वय 28 रा.पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विपुल अजय चव्हाण (वय 29 रा. नवी सांगवी) व केतन चंदिले (रा. पिंपळे गुरव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon : पोलीस असल्याची बतावणी करत ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण करून खून, दोघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुचाकीवरून जात असताना त्यांचा मित्र अनिकेत घोगरे हा थांबलेला दिसला. त्याला फिर्यादीच्या ओळखीचे चव्हाण व चंदिले हे शिवीगाळ करताना दिसले. यावेळी फिर्यादी यांनी गाडी थांबवून काय झाले अशी विचारणा केली.

यावेळी तू इथेच थांब म्हणत आरोपी तेथून गेले व परत दुचाकीवर येत त्यांनी फिर्यादी यांना बांबूने व कोयत्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी विपुल याने कमरेला असलेला कोयता काढून फिर्यादीच्या डोक्यावर मारला ज्यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले.

अनिकेत याने भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करत जखमी केले. आरोपींना अद्याप अटक झाली नसून सांगवी पोलीस पुढील तपास करत (Pimple Gurav)  आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.