Pune : निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराईतांची झाडाझडती

एमपीसी न्यूज – शहरातील एक हजार सराइतांची पोलीस आयुक्त अमितेश कुमार ( Pune)  यांनी गुरुवारी झाडाझडती घेतली. शहरातील 109 पोलीस चौक्यांमध्ये सराईतांना बोलावून त्यांची चौकशी करण्यात आली. शहरातील पोलीस चौक्यांचे सक्षमीकरण करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

पोलीस आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अमितेश कुमार यांनी सराईतांची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले. गेल्या पाच वर्षात खूनखुनाचा प्रयत्नतडीपार, मोक्का कारवाई केलेल्या सराईतांची चौकशी करण्यात येत आहे. गंभीर गुन्ह्यात जामीन मिळवून बाहेर पडलेल्या सराईतांची चौकशी करण्यात येत आहे. पोलीस आयुक्तांनी शहरातील गुंड टोळ्यांचे प्रमुखसाथीदारांना गुन्हे शाखेत बोलावून त्यांची झाडाझडती घेतली होती. गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी गुंड टोळ्यांच्या प्रमुखांना ताकीद दिली होती. त्यानंतर पोलीस आयुक्तांच्या आदेशाने शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईतांची चौकशी करण्यात आली.

Chinchwad : नदी प्रदूषणास वाढते नागरिकरण जबाबदार – संजय कुलकर्णी 


सराईत ज्या भागात वास्तव्यास आहेतत्यांना त्या भागातील पोलीस चौकीत बोलावण्यात आले. पोलीस चौकीत त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांचा पत्तानातेवाईकांची माहिती घेण्यात आली. पोलीस चौकीतील अधिकाऱ्यांनी सराईतांची माहिती संकलित केली. शहरात गेल्या महिन्यात सलग चार गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या. गोळीबारात येरवडा भागातील एका  हाॅटेल चालक तरुणाचा मृत्यू झाला होता.

वाहन तोडफोडदहशत माजविणेतसेच गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता पोलीस चौकी स्तरावर सराईतांची चौकशी सुरू केली. गुरुवारी (दि.एप्रिल) शहरातील एक हजार सराईतांची चौकशी करण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेश कुमारअतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडेउपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात ( Pune) आली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.