Kalewadi : लग्न मंडपात लावलेल्या फटाक्यांमुळे स्टेजला आग; एकजण जखमी

एमपीसी न्यूज – लग्न मंडपात इलेक्ट्रिक कनेक्शनवर लावलेल्या फटाक्यांमुळे डेकोरेटेड (Kalewadi) स्टेजला आग लागली. यामध्ये एकजण जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. 6) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास बालाजी लॉन्स, काळेवाडी येथे घडली.

 

प्रज्वल चिल्लाळ (वय 20) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

Today’s Horoscope 07 May 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास धनंजय पवार यांनी पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाला माहिती दिली की, बालाजी लॉन्स काळेवाडी येथे आग लागली आहे. त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्र, रहाटणी, थेरगाव उप अग्निशमन केंद्राचे बंब घटनास्थळी दाखल झाले. डेकोरेटेड स्टेजला लागलेली आग उपस्थित नागरिकांनी विझवली.

 

लग्न सोहळा सुरू असताना इलेक्ट्रिक कनेक्शन वर फटाके लावण्यात आले होते. या फटाक्यांमुळे आग लागली. दरम्यान ऑपरेट करत असलेला व्यक्ती प्रज्वल चिल्लाळ हा जखमी झाला तो सुमारे 20 ते 22 टक्के भाजला गेला आहे. त्याला नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले (Kalewadi) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.