Junnar : पिंपरी कावळ येथे विसर्जनाच्या वेळी तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू
एमपीसी न्यूज- गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी तलावात बूडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला.सायंकाळी साडेपाच वाजता पिंपरी कावळ गावी ही घटना घडली.
सुमित सावकार पाबळे(वय 11),वैभव विलास पाबळे (वय 11) तसेच गणेश नारायण चक्कर(वय 9) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत.
या घटनेने पिंपरी कावळ गावावर शोककळा पसरली आहे. आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले .या दुर्घटनेत पाण्यात बुडालेल्या एका मुलाचा जीव वाचविण्यात यश आले आहे. ओंकार एकनाथ चक्कर (वय 8) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर आवारे हॉस्पिटल आळेफाटा येथे उपचार सुरु आहेत.