Pimple Saudgar : पिंपळे सौदागरला ल्युमॅक्स करिअर एज्युकनेक्ट कार्यक्रम

एमपीसी न्यूज –   ल्युमॅक्स  कंपनीच्या वतीने व  फ्युअल एनजीओ  यांच्या संयुक्त विद्यमानाने  इयत्ता ९ वी ते इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी  “लुमॅक्स करिअर एज्युकनेकट् कार्यक्रम” चा शुभारंभ पिंपळे सौदागर येथील अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय या ठिकाणी करण्यात आला. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनचे आयोजन करण्यात आले होते. 

पिंपळे सौदागरला झालेल्या कार्यक्रमासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक  शत्रुघ्न काटे, फ्युअल या एनजीओचे अध्यक्ष केतन देशपांडे, सीएसआरच्या प्रमुख प्रियांका शर्मा, ल्युमॅक्सचे राजेश डुब्बेवर, प्युअल एनजीओच्या मयुरी देशपांडे, मुख्याध्यापिका सुनीता इसकांडे, ल्युमॅक्सची सर्व टीम तसेच शाळेतील सर्व सहकारी शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

यावेळी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. ते म्हणाले “करिअरच्या जुन्या वाटा बदला कारण जगात इंजिनिअर, डॉक्टर यांच्यापेक्षा नवीन क्षेत्राला मागणी वाढत आहे. करियरच्या वाटा शोधताना स्वतःला काय व कशात करिअर करायचे आहे. याचा प्रथम विचार करा. कोणत्याही मानसिक दबावाला बळी पडू नका. आयुष्यात जे काही बनाल ते “बेस्ट” च बना. कोणतेही कार्य करताना उत्तमतेचा ध्यास धरा. आयुष्यात ध्येय ठरवतांना सर्वात उच्चप्रकारचे ध्येय निवडा. सर्व सामान्य ध्येय ठरवून पदवी मिळवणे म्हणजे शिक्षण नव्हे. शिक्षणाचा ध्यास घ्या. स्वतःला समाजाला व आपल्या देशाला उच्च शिखरावर न्या”.

यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी ही विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला काटे म्हणाले की, स्वतःचे करिअर निवडताना स्वतःची बुद्धी, क्षमता, आवड व काळाची गरज याचा विचार नक्की करावा जेणेकरून आपला भविष्य सुर्यासारखा तेजस्वी राहील”.    कार्यक्रमापूर्वी इयत्ता ९ वी ते इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांची अॅप्टीट्यूड टेस्ट घेण्यात आली. या टेस्टमधील टॉप टेन विद्यार्थांना आयुक्त श्रावण हर्डीकर व नगरसेवक  शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. संस्थेच्या वतीने यशस्वी करिअर साठीचे पर्याय, ओघवत्या तक्त्याद्वारे व स्लाईड शो द्वारे दाखविण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती  के. ए. चव्हाण, एम. देशपांडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार के. ए. चव्हाण यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.