Vadgaon Maval : मावळ तालुका आय काँग्रेस लिगल सेलच्या अध्यक्षपदी अॅड सुधीर भोंगाडे

एमपीसी न्यूज- तालुका काँग्रेस पक्षकार्यालय वडगाव येथे दसऱ्याच्या मुहूर्तावर मावळ तालुका काँग्रेस लिगल सेलची निर्मिती करण्यात आली. 40 वकीलांच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यात अॅड सुधीर भोंगाडे यांना मावळ तालुका काँग्रेस आय लिगल सेल अध्यक्ष म्हणून नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, तालुका अध्यक्ष बाळासाहेब ढोरे , कार्याध्यक्ष अॅड खंडुजी तिकोणे, युवक अध्यक्ष विलास मालपोटे, वडगांवचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, सरचिटणीस संपत दाभाडे, अॅड नामदेवराव दाभाडे, अॅड दिलीप ढमाले, अॅड राजेंद्र गाडे, अॅड शिवाजी मोरे, अॅड धनंजय कोद्रे, अॅड गणेश जगताप, अॅड देविदास मराठे, अॅड अमोल दाभाडे, अॅड राम शहाणे, अॅड.दीपक चौधरी, अॅड सुरज देसाई, अॅड चेतन औरंगे, अॅड महेंद्र खांदवे, अॅड राकेश वहिले,अॅड प्रशांत दाभाडे तसेच सर्व वकील मित्र ,काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

माउली दाभाडे ,राजेंद्र गाडे पाटील आणि दिलीप ढमाले यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक कार्याध्यक्ष अॅड खंडुजी तिकोणे यांनी केले. आभार अॅड दिलीप ढमाले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.