Pune : कुरकुरे देण्याच्या आमिषाने पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार, नराधमाला बेड्या
एमपीसी न्यूज – पाच वर्षीय चिमुरडीला कुरकुरे देण्याच्या आमिषाने इमारतीच्या गच्चीवर नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या 35 वर्षीय नराधमाला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हा प्रकार 4 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास वैदूवडी येथील म्हाडा कॉलनीत घडला.
गजानन लक्ष्मण चाकोते (वय 35, रा. नवीन म्हाडा कॉलनी वैदवाडी, हडपसर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी खेळत असताना संशयित आरोपीने तिला कुरकुरे घेऊन देण्याच्या आमिषाने राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवर नेले. त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला. इतकेच करून हा नराधम थांबला नाही तर तिला ठार मारण्याच्या उद्देशाने तिचे डोके भिंतीवर आपटले. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून पोलीस उप निरीक्षक गावडे याचा अधिक तपास करीत आहेत.