Pimpri : मोबाईल कंपनीच्या बनावट साहित्याची विक्री केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

एमपीसी न्यूज – मोबाईल कंपनीचे लोगो, बॅटरी, स्क्रीन गार्ड, बॅक कव्हर, डिस्प्ले, हेडफोन अशा प्रकारचे बनावट साहित्य मूळ कंपनीचे असल्याचे भासवून विक्री केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. १५) चारच्या सुमारास पिंपरी मधील डीलक्स चौक येथे घडली.

वसनाबाई मनकाजी रब्बारी (वय 20, रा. साईचौक, मूळ रा. गुजरात), मोहबताराम पिराजी चौधरी (वय 19, रा. पिंपरीगाव), गणेश भगवानरामजी चौधरी (वय 21, रा. पिंपरी), जामताराम जेठाराम चौधरी (वय 24, रा. साईचौक, मूळ रा. राजस्थान) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पिंपरी डीलक्स चौक येथील डीलक्स मॉलमधील दुकानांमध्ये अॅपल कंपनीचे नाव व नकली लोगो असलेले मोबाईल बॅटरी, स्क्रीन गार्ड, बॅक कव्हर, डिस्प्ले, हेडफोन असे साहित्य विकत होते. याबाबतची माहिती पिंपरी पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. चौघांकडून एकूण तीन लाख पंचवीस हजार रुपयांचा विक्रीसाठी ठेवलेला बनावट माल पोलिसांनी जप्त केला. चौघांवर कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.