Wakad : भाड्याने घेतलेल्या हजारोंच्या फर्निचरचा अपहार
एमपीसी न्यूज – एसी आणि सोफा भाड्याने घेतला. त्याचे भाडे न देता एसी आणि सोफा लंपास केला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना डांगे चौक वाकड येथे 21 जानेवारी ते 21 मे 2019 या कालावधीत घडली.
सागर गिरीश मोटवानी (वय 21, रा. प्रभात कॉलनी, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राहुल रुपेश कदम (रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर यांचे डांगे चौक वाकड येथे व्ही एस फर्निचर नावाचे दुकान आहे. या दुकानातून राहुल याने 21 जानेवारी 2019 रोजी 64 हजार 545 रुपये किमतीचा व्हिडिओकॉन कंपनीचा एसी आणि एक सोफा भाड्याने घेतला.
अद्यापपर्यंत त्याचे भाडे दिले नाहीत. तसेच वस्तूही परत केल्या नाहीत. याबाबत अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.