Pune News : खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

 दोन दिवसांनी मृतदेह सापडला

एमपीसी न्यूज : मित्रांसोबत खडकवासला धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या एका 13 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. प्रणव विनोद सणस असे या मुलाचे नाव आहे. दोन दिवसानंतर त्याचा मृतदेह सापडला. 

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की किरकिटवाडी येथे राहणारा मुलगा 19 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत खडकवासला धरणाच्या मागच्या बाजुला असणाऱ्या कालव्यामध्ये पोहण्यासाठी गेला होता. या कालव्यामधून दौंड इंदापूर हवेली या तालुक्यासाठी खडकवासला धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू आहे. पाण्याचा वेग जास्त असल्याने आणि पोहता येत नसल्याने प्रणव पाण्यात बुडून काही क्षणात दिसेनासा झाला.

दरम्यान याची माहिती मिळाल्यानंतर हवेली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याची माहिती त्यांनी अग्निशमन दलालाही दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला परंतु प्रणव सापडला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शोधकार्य सुरू असताना रात्री सात वाजण्याच्या सुमारास नांदेड फाट्याजवळील पुलापासून काही अंतरावर प्रणवचा मृतदेह सापडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.