Pune News : घरातील कामावरून वडील रागावल्याने पंधरा वर्षीय मुलगी घरातून निघून गेली

एमपीसी न्यूज : घरातील कामावरून वडील रागावल्यामुळे पंधरा वर्षीय मुलगी घर सोडून निघून गेली. सोमवारी सायंकाळी या मुलीने घर सोडले ती अद्याप परत आलीच नाही. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

_MPC_DIR_MPU_II

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित मुलीचे वय पंधरा वर्षे इतके आहे. घरात काम करण्यावरून तिला वडील रागावले होते. याचाच राग आल्याने या मुलीने सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घर सोडले. त्यानंतर अद्याप पर्यंत ती परत आलीच नाही. त्यानंतर त्या मुलीच्या आईने हडपसर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.

त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीने कशाचे तरी आमिष दाखवुन या मुलीला फिर्यादीच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.