Sangvi : योग्य व्यक्तींपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी इनसेट फाउंडेशनला संपर्क साधण्याचे आवाहन 

एमपीसी न्यूज – सांगली- कोल्हापूरमधील परिस्थिती अतिशय बिकट आहे. अनेक सेवाभावी संस्था व युवक संघटना मदतीसाठी धावून येत आहेत. मात्र, सध्याची परिस्थिती आणि पूर ओसरल्यानंतरची परिस्थिती, पुनर्वसन यासाठी योग्य व्यवस्थापनाद्वारे काम करण्याची गरज आहे.

हे लक्षात घेऊन कराड येथील इनसेट फाऊंडेशनने सहाय्यता दूरध्वनी आणि घटनास्थळी कार्यरत असणारे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आवश्यक असलेल्या सेवा, वस्तू आणि स्वयंसेवक याबाबतची यादी करून योग्य व्यक्तीपर्यंत मदत पोहचेल, अशी व्यवस्था केली आहे. तसेच गरज असलेल्या वस्तू आणि सेवांसाठी आवाहन करण्याचे काम फाऊंडेशन करत आहे. यामुळे जमा झालेला निधी किंवा वस्तू या योग्य ठिकाणी पोहोचतील.

सरकारी यंत्रणा आणि नागरी संघटना यांच्यामधे संवाद साधून पश्चिम महाराष्ट्राला सावरण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. व्यक्ती, संस्था, संघटना किंवा सरकारी यंत्रणेकडून दिली जाणारी मदत योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी इनसेट फाउंडेशनला 8554827171 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.