Talegaon Dabhade News : शिक्षण महर्षी कृष्णराव भेगडे यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण सोहळा संपन्न

एमपीसीन्यूज – नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष मावळभूषण शिक्षण महर्षी कृष्णराव भेगडे यांच्या 85 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित एकूण 18 शाखांमध्ये एकत्रित आणि एकाच वेळेस सुमारे पाचशे पन्नास वृक्षांची लागवड करण्यात आली. 

यामध्ये प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, इंग्लिश मिडीयम स्कुल, ज्युनिअर कॉलेज, व अभियांत्रिकी महाविद्यालये यांचा समावेश होता. याप्रसंगी संस्थचे खजिनदार राजेश म्हस्के यांनी अध्यक्षपद भूषविले  तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे माजी खजिनदार सुरेशभाई शहा व संस्थेचे विश्वस्त गणपत काळोखे उपस्थित होते. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव संतोष खांडगे, विश्वस्त सोनबा गोपाळे, विश्वस्त दामोदर शिंदे, विश्वस्त वसंत भेगडे, विश्वस्त विनायक अभ्यंकर, शंकर नारखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी कृष्णराव भेगडे साहेबांचा जीवनपट आपल्या खास शैलीत मांडत कार्यक्रमाची प्रस्तावना केली.

साहबांचे वैशिष्ट्य म्हणजे या वयात देखील त्यांनी आपली वाचनाची आवड जोपासली असून प्रत्येक पिढीतील व्यक्तींशी योग्य सवांद साधत विचारांची देवाणघेवाण करणे, चालू घडामोडींचा आजही सखोल अभ्यास करणे या साहेबांच्या व्यकित्त्व गुणांचा उलगडा कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश म्हस्के यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केला.

याप्रसंगी  मनोगत व्यक्त करत असताना सुरेशभाई शहा यांनी जुन्या पिढीतील आठवणींना उजाळा दिला तर गणपत काळोखे गुरुजी यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व सांगताना नवनवीन झाडे लावणे व त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना येवले यांनी केले तर संस्थेचे विश्वस्त सोनबा गोपाळे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन दीपक जाधव, संतोष शेळके, क्रीडा शिक्षक राजेंद्र लांडगे, प्रिती घुले यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.