Rajesh Vitkari : चुकून शिंदे गटात गेलेला शिवसैनिक परत ठाकरे गटात आला, आणि म्हणाला…

एमपीसी न्यूज – शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर अनेक आमदार, खासदार, पदाधिकारी आणि शिवसैनिक देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यात दररोज नवनवीन भर पडतच आहे. अनेक आजी – माजी पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहेत. मात्र पुण्यातील एका शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आधी शिंदे गटात प्रवेश केला आणि त्यानंतर अवघ्या काही वेळात पुन्हा ठाकरे गटात तो परत आला. राजेश विटकरी असं (Rajesh Vitkari)  या शिवसैनिकाचे नाव आहे. 

 

 

राजेश विटकरी हे पुण्यातील गोखले नगर परिसरात राहतात. त्या विभागाचे प्रतिनिधित्वही करतात. राज्यात जेव्हा बंडखोरी झाली आणि त्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांचा सरकार आलं त्यानंतर राजेश विटकरी (Rajesh Vitkari)  हे शिंद गटात दाखल झाले होते. मात्र त्यानंतर ते पुन्हा ठाकरे गटात परतले आहेत. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांची त्यांनी भेट घेतली आणि पुन्हा ठाकरे गटात परतण्याचा निर्णय घेतला.

 

Droupadi Murmu Oath Taking Ceremony : द्रौपदी मुर्मू यांचा आज शपथविधी

 

याबद्दल सांगताना विटकरी म्हणाले, मी एकनाथ शिंदे यांना मुंबईत भेटलो. मात्र पुण्यात परत आल्यानंतर नीलम गोरे यांचा मला फोन आला आणि त्यांनी भेटण्यासाठी बोलावले. नीलम गुरूंना भेटल्यानंतर मी माझं मत बदललं आणि पुन्हा शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. हे सांगत असताना मिटकरी यांना अश्रू अनावर झाले. हे सगळं थांबलं पाहिजे आणि शिंदे सेना आणि ठाकरे सेना एकत्र आली पाहिजे, असे देखील ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.