Talegaon Dabhade : माळवाडी येथे ‘आमचं गाव आमचा विकास’ अभियानांतर्गत गणस्तरीय कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज – जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती मावळ यांच्या मार्फत ‘आमचं गाव आमचा विकास’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा गणस्तरीय कार्यशाळा प्रशिक्षण माळवाडी येथील माऊली मंगल कार्यालय येथे पार पडले.

यामध्ये प्रामुख्याने माळवाडी, वराळे, इंदोरी, सुदवडी, जांबवडे, सुदुंबरे, गावामधील सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच व इदोरी पंचायत समिती गणामधील ग्रामस्थ कार्यशाळेस उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी पंचायत समिती मावळचे शिक्षण विस्तार अधिकारी वाळुंज, अंगणवाडी पर्यवेक्षिका पंचायत समिती मावळच्या श्रीमती देसले, इंदोरी मावळ केंद्रप्रमुख शोभा गुप्ते, ग्रामसेवक इंदोरी कैलास कोळी, वराळे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अरूण सोळंके, सुदवडी येथील श्रीमती बिरदवडे या सर्वांनी अभियानाची माहिती दिली. मावळ तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष सुनील भोंगाडे यांनी देखील मार्गदर्शन केले.

गावचा विकास आराखडा मांडत असताना इंदोरीतील उपसरपंच दिनेश चव्हाण तसेच अंकुश ढोरे यांनी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करून मार्गदर्शन केले. माळवाडी गावच्या सरपंच पुनम अल्हाट, पल्लवी दाभाडे यांनी माळवाडी ग्रामपंचायतच्या वतीने आलेले सर्व नागरिकांचे स्वागत करून आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.