ACB action : पाच हजारांची लाच घोताना वैद्यकीय अधिक्षक व शिपायाला अटक

एमपीसी न्यूज दौंड उपजिल्हा रुग्णालयातील प्रभारी वैद्यकीय अधीक्षक व मदतनिस शिपाई यांना लाचलुचपत विभागाने पाच हजारांची लाच घेताना अटक केली आहे.(ACB action) ही कारवाई सोमावारी (दि.17)  दौंड उपजिल्हा रुग्णालयातच करण्यात आली.

वैद्यकीय अधीक्षक संग्राम माणिकराव डांगे (वय 46) व शिपाई नानासाहेब पांडुरंग खोत (वय57) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

Chandrakant Patil : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावले पालकमंत्री

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे दुबार विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी आरोपी डांगे याने तीन हजार तर खोत याने 2 हजार रुपयांची मागणी केली होती. (ACB action) ही लाच खोत याने तक्रारदारा कडे केली होती. ही लाच स्विकारताना सापळा रचून दोन्ही आरोपींना रंगे हात अटक करण्यात आले आहे. याचा पुढिल तपास लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक विरनाथ माने करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.