Pimpri : महेशनगरमधील अतिक्रमणावर कारवाई 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने संत तुकारामनगर, महेशनगर येथील चौपाटीवरील अतिक्रमणावर कारवाई केली. आज (गुरुवारी) ही कारवाई करण्यात आली. 

‘ह’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ही कारवाई करण्यात आली. यामध्ये एक लोखंडी काऊंटर, आठ हातगाड्या, सहा टप-या, एक तीन चाकी टेम्पो, एक चार चाकी टेम्पो आदी साहित्य जप्त केले. महापालिकेचे सहशह अभियंता राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता, 4 कार्यालयीन अधिक्षक, 8 मुख्य लिपिक, 42 मजूर, 1 महापालिका पोलीस उपनिरीक्षक, 10 मनपा पोलीस, 5 डंपर, 1 क्रेन, तसेच 1 कनिष्ठ अभियंता, 3 बीट निरीक्षक यांनी ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.