Crime News : किवळे तलाठी कार्यालयातील मदतनीसावर लाचेची मागणी केल्याप्रकरणी कारवाई

एमपीसी न्यूज : रावेत येथील सोसायटीच्या जागेची नोंद 7/12 उतार्‍यावर करण्यासाठी किवळे तलाठी कार्यालयात मदतनीस म्हणून काम करणार्‍या एका इसमाने (Crime News) 35 हजार रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेत येथील सोसायटीच्या जागेची नोंद 7/12 उतार्यावर करण्यासाठी किवळे तलाठी कार्यालयातील मदतनीस नितीन ढमाले यांने किवळे तलाठी यांच्यासाठी लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभाग पुणे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

Pune News : देश वेगाने विकासाच्या दिशेने जातो आहे, पण त्यापेक्षा वेगाने देशातील वातावरण बिघडतंय

किवळे तलाठी कार्यालयात चौकशी केली असता या कार्यालयात मदतनीस म्हणून काम करणारे नितीन ढमाले यांनी तक्रारदाराबरोबर चर्चा करून 35 हजार रूपयांच्या (Crime News) लाचेची मागणी केली होती. त्याअनुशंगाने देहू रोड पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभाग पुणे युनिटचे पोलीस निरिक्षक संदिप वर्हाडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.