Jadhavwadi News: अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा धडका सुरुच, 9 बांधकामे भुईसपाट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रिय अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या वतीने अनधिकृत बांधकामावरील कारवाईचा धडाका सुरु आहे. प्रभाग 2 जाधववाडी, कुदळवाडी मधील बालघरेनगर येथील अनधिकृत घरे, पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. याबाबतची माहिती उपअभियंता, प्रवक्ते विजय भोजने यांनी दिली.

क क्षेञिय कार्यालय प्रभाग क्रमांक 2 जाधववाडी, कुदळवाडी येथे आज (बुधवारी) महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंञण विभागामार्फत कारवाई करण्यात आली.9 अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली. अंदाजे 2200 चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.

सहशहर अभियंता मकरंद निकम तसेच कार्यकारी अभियंता, संजय घुबे, क क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता, सुर्यकांत मोहिते, उप अभियंता सुधीर मोरे, कनिष्ठ अभियंता अमोल पडलवार व इतर 4 कनिष्ठ अभियंता, 12 बिट निरीक्षक, क व फ क्षेत्रिय कार्यालयाचे अतिक्रमण पथक, अतिक्रमण विभागाने कारवाई केली. कारवाई दरम्यान 28 पोलीस कर्मचारी, चिखली पोलिस स्टेशनचे पी.एस.आय – 1, पोलीस कर्मचारी – 5, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडाळाचे सुरक्षारक्षक – 58 , अग्निशामक दलाचे पथक तैनात होते. वैद्यकिय विभागाची रुग्णवाहिका, विद्युतविभागाचे कर्मचारी, मजूर – 25 , जे.सी.बी – 5, पोकलेन – 2, डंपर – 3 गॅस कटर – , 2 क्रेनच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.