MAVAL : कुंडमळ्यात वाहून गेलेल्या युवकाचा तीन दिवसानंतरही शोध सुरू

एमपीसी न्यूज – कुंडमळा येथे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या युवकाचा आज तीन दिवसानंतरही शोध सुरू आहे. ही घटना बुधवारी (दि.15) घडली. 

मसाउद्दीन सलाउद्दीन खान (वय 17, रा. पिंपरी) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मसाउद्दीन हा  गीता माता कॉलेज, चिंचवड येथे  कॉमर्स शाखेत 12 वी मध्ये शिकत असून तो आणि त्याचे मित्र असे एकूण 13 जण 15 ऑगस्ट च्या दिवशी मावळातील कुंडमळा येथे फिरायला गेले होते. तिथे खेळता खेळता मसाउद्दीन आणि त्याचा मित्र अल्ताफ हे दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. तरी तेथील एका स्थानिक मच्छीमाराने वाचवले परंतु मसाउद्दीन हा वाहून गेला. विशेष म्हणजे मसाउद्दीन हा अट्टल पोहणारा मुलगा होता. तीन दिवसांनंतरही त्याचा शोध सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.