Pune News : अग्रवाल समाज फेडरेशन गोल्डन क्लबतर्फे आयोजित आध्यात्मिक सहलीची सांगता

एमपीसी न्यूज – अग्रवाल समाज फेडरेशनच्या गोल्डन क्लबने दोन दिवसीय आध्यात्मिक सहलीचे आयोजन केले होते. या आंतरराज्यीय आध्यात्मिक यात्रेची सांगता झाली (Pune News) असून यामध्ये गोल्डन क्लबचे 143 ‘तरुण वृद्ध भक्तसहभागी झाले होते.

23 ते 24 जानेवारी दरम्यान ही सहल पार पडली, या यात्रेत भाविकांनी तुळजापूर येथील आई तुळजा भवानी, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज, गंणगापूर येथील श्री दत्तात्रेय भगवान आणि पंढरपूर येथील भगवान विठ्ठल रुक्मिणी व माता महालक्ष्मी आदींचे दर्शन घेतले.

प्रवाशांच्या वाहतुकीसाठी 3 एसी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती, तर सर्व प्रवाशांना त्यांच्या सुखकर व मंगलमय प्रवासासाठी शुभेच्छा देण्यासाठी अग्रवाल समाज फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष.विनोद बन्सल, सचिव सी.ए. के.एल. बन्सल, खजिनदार श्याम गोयल, (गोल्डन क्लबचे अध्यक्ष सीए विनोद अग्रवाल, मुख्य समन्वयक संजीव ओमप्रकाश अग्रवाल, गोल्डन क्लबच्या सचिव सरस्वती गोयल, जयकिशन गोयल, सुप्रसिद्ध अँकर रत्ना बिटकर हडपसर येथे उपस्थित होते. फेडरेशनचे उपाध्यक्ष विनोद शिवनारायण बन्सल आणि सचिव के एल बन्सल हे संपूर्ण यात्रेदरम्यान भाविकांच्या सोबत राहिले.

Pune : लोकशाही सबलीकरणासाठी तरुणांना राज्यघटनेचे ज्ञान आवश्यक – व्हॉईस ॲडमिरल देशपांडे

यात्रेसाठी निघालेल्या तीन बसेस पैकी एक बस विश्रांतवाडी येथील सोमेश्वर मंदिरातून सुनील काश्मिरीलाल गर्ग, मीना देवेंद्र गोयल, दर्शना सुनील गर्ग यांच्या नेतृत्वाखाली निघाली (Pune News) तर दुसरी बसचे नेतृत्व अग्रसेन भवन चिंचवड या इमारतीतून गोल्डन क्लबचे खजिनदार. के. बी गोयल, सुनीता धानुका आणि सुनील अग्रवाल. तसेच मार्केट यार्डातील गंगाधाम येथून तिसरी बस रवाना झाली, ज्याचे नेतृत्व जयकिशन गोयल आणि गोल्डन क्लबच्या सचिव सरस्वती गोयल, अंजू गर्ग यांनी केले.

तुळजापूरकडे रवाना झालेली यात्रा सायंकाळी गुप्त नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर भाविकांनी तुळजा भवानीचे दिव्य दर्शन घेतले व वाटेत चहा-नाष्टा करून यात्रा अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराकडे रवाना झाली. सायंकाळीच सिद्ध गुरु भगवतलीन ब्रह्मस्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या समाधीचे व मंगलमूर्तीचे दर्शन होऊन सर्व भाविकांनी अन्नछत्रातील महाप्रसाद घेतला.

त्यानंतर सर्व भाविकांनी श्रीस्वामी समर्थ ट्रस्टच्या भक्त निवासातील 165 हून अधिक खोल्यांमध्ये रात्रीचा विसावा घेतला. या सर्व खोल्या गोल्डन क्लबने आगाऊ बुक केल्या होत्या.

दुसर्या दिवशी म्हणजेच 24 जानेवारीला सकाळी स्वामी समर्थ ट्रस्टच्या सभागृहात सकाळचा चहापान करून सर्व भाविक कर्नाटक राज्यातील 3 बसेसमध्ये बसून गाणगापूर कर्नाटक कडे निघाले. (Pune News) गाणगापूर येथे भगवान स्वयंभू श्री दत्तात्रेयांचे दर्शन घेतले तेथून पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेत पुण्याकडे प्रस्थान केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद अग्रवाल, उपाध्यक्ष सुनील गर्ग, संजीव ओमप्रकाश अग्रवाल, सरस्वती गोयल, के.बी. गोयल, जयकिशन गोयल, मीना देवेंद्र गोयल, दर्शना गर्ग, अंजू गर्ग यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी पूर्व नियोजनासह पूर्ण निष्ठेने काम केले. भाविकांनी आयोजकांचे मनापासून आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.