Pune News : एवढे भावूक होऊ नका, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

एमपीसी न्यूज – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी तसेच पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून गुरुवारी छापे टाकण्यात आले.  साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर सुद्धा प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. मात्र या धाडसत्रांना विरोध म्हणून आज पुण्यात कौन्सिल हॉलबाहेर अजित पवार समर्थकांनी ‘We Support Ajit Dada’ असे फलक झलकवत अजित पवारांची पाठ राखण केली.

अजित पवार हे कोरोना आढाव बैठक घेण्यासाठी जात असताना हे आंदोलन सुरू होते. त्यावेळी कार्यकर्त्यांचे प्रेम बघून अजित पवार भावूक झाले. त्यावर पवार म्हणाले, ‘मी सांगितले आहे एवढे भावूक होऊ नका आपण जे करताय ते खूप चुकीचे करत आहात,’ असे पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले. आज अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे पुण्यात करून आढावा बैठक घेतली.

दरम्यान, अजित पवार म्हणाले, ‘आयकर विभागाने जी कारवाई केली आहे. ती एकदम चुकीची आहे. त्यांनी माझ्या बहिणीच्या घरी कारवाई करायला नव्हती पाहिजे. आयकर विभाग यांनी केलेल्या चौकशीत त्यांच्या चौकशीत कोणताच व्यत्यय आणणार नाही. त्यांनी सगळी चौकशी केल्यानंतर स्पष्टीकरण देणार, मी कुठेही पळून जाणार नाही.’

‘कोणाच्या काळात कोणते कारखाने विकले त्यांची अवस्था आज काय हायकोर्टाने याची माहिती दिली का, हे सगळे आयकर विभागाने चौकशी केल्यानंतर मी बोलेन असे ही अजित पवार म्हणाले. दरम्यान, लखिमपूर घटनेवर त्यांनी भाष्य केले ते म्हणाले,’ लखीमपूरची घटना दुदैवी तो काळा दिवस आहे. एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले एक दुर्दैवी घटना आहे म्हणून महाविकास आघाडी सरकारने 11 ऑक्टोंबर ला महाराष्ट्र बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.’

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत घेणार की नाही अशी चर्चा आहे त्यावर अजित पवार म्हणाले, ‘पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेला सोबत घेण्याचा विचार आहे वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेणार.’ शिळ्या कढला ऊत आणण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. आपल्याकडे दंडुकेशाही नाही लोकशाही आहे . असे बोलून पवारांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.