Akurdi : हभप शंकरराव तरटे यांचे वृद्धपकाळाने निधन

एमपीसी न्यूज – दत्तवाडी येथील हभप शंकरराव राघु तरटे यांचे वृद्धपकाळाने नुकतेच निधन झाले आहे.ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, चार मुले, एक मुलगी, तीन बहिणी, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

हभप शंकरराव राघु तरटे यांनी दत्तवाडी येथील श्री दत्त तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम केले. तसेच त्यांनी शिवजयंती, गणेशोत्सव, दत्त जयंती, काकडा आरती सप्ताह,जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अशा अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोठे योगदान दिले आहे.

एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची पंचक्रोशीत ख्याती होती. ताराचंद तरटे आणि कै.पांडुरंग तरटे यांचे ते बंधु होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.