Akurdi News: लेखी नोटीस दिल्याशिवाय वीज मीटर कनेक्शन तोडू नये; आपची मागणी

एमपीसी न्यूज – कोणतीही नोटीस न देता महावितरणच्या कर्मचा-यांकडून वीज मीटर कनेक्शन तोडले जाते. हे चुकीचे असून लेखी नोटीस दिल्याशिवाय वीज मीटर कनेक्शन तोडू नये अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर आम आदमी पार्टीने केली आहे.

याबाबत महावितरणचे कार्यकारी अभियंते उदय भोसले यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, विद्युत अधिनियमातील कलम 56 मधील तरतुदीनुसार, विज बिलाची रक्कम भरण्याची जी मुदत दिलेली असते, त्या मुदतीपर्यंत ग्राहकाने बिल भरले नाही तर विज कंपनीने ग्राहकास 15 दिवसांची डिस्कनेक्शन नोटीस देणे बंधनकारक आहे. परंतु, असे असूनही महावितरणचे कर्मचारी ग्राहकांची विज परस्पर तोडत आहेत. प्रकारामध्ये आपण लक्ष देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना 15 दिवसाची डिस्कनेक्शन नोटीस देण्याची सूचना करावी.

सामान्य नागरिक जर आपले बील सातत्याने व रेग्युलर भरत असेल. पूर्वीचे बिल काही कारणाने भरणे अशक्य झाले. त्यात महावितरणचीही कारणे असतात. अशा परिस्थितीत विज कनेक्शन न तोडता सतत दोन महिने बिल न भरल्यासच नंतर कारवाई व्हावी.

तसेच नोटीस/ सूचना /1 ते 2 दिवसाचा तरी अवधी बिल भरण्यास ग्राहकास द्यावा. कारण नकळवता कनेक्शन तोडल्यास ग्राहकास पुन्हा जोडणी शुल्क आकारले जाते. अशा परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या विस्कटलेल्या अवस्थेत अनेकांचे रागाच्याभरात महावितरण कार्यालयात मानसिक संतुलन बिघडून आक्रमक होणे,अंगावर धावून जाने,तोड फोड-करणे याघटना घडत आहे. सामान्यावरील मानसिक ताण समजून, नियमित बिलभरणा करणाऱ्यास समजून घेऊन पद्धतीत योग्यबदल करावेत अशी मागणी आम आदमी पार्टी कडून चेतन बेंद्रे ,वैजनाथ शिरसाठ,आशुतोष शेळके,एकनाथ पाठक, सरोज कदम यांनी केली.

https://youtu.be/E3jTgxKBl8g1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.