Akurdi Road Work : बाजारपेठेतील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – आकुर्डीतील मुख्य बाजारपेठमधील (Akurdi Road Work) रत्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी विठ्ठल प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल दळवी यांनी केली आहे.

आकुर्डी मुख्य बाजारपेठमधील रत्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम बरेच दिवसांपासून सुरु आहे. आत्ता ज्या ठिकाणी काम चालू आहे, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर विठ्ठलवाडीकडून आकुर्डी मेन रोडकडे येणार रस्ता सिमेंट कॉन्क्रीटकरण करण्याच्या कामामुळे एक महिन्यापासून बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा वळसा घालून विठ्ठलवाडीकडून आकुर्डी बाजार पेठ मेन रोडकडे जावे लागत आहे.

Housing Project : गृहप्रकल्पाचा खर्च साडेतीन कोटींनी वाढला; प्रशासकांची वाढीव खर्चाला मान्यता

ज्या ठिकाणी काम चालू आहे. त्या ठिकाणच्या एका बाजूच्या रस्त्याचे काम चालू असल्यामुळे तो बंद ठेवण्यात आला आहे. एका बाजूने वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. पण, रस्ता लहान असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागत आहेत. छोटे अपघात देखील होत आहेत. येत्या 21 जूनला आकुर्डी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आहे.

आकुर्डीमध्ये एक दिवसासाठी मुक्कामासाठी वारकरी येणार आहेत. लाखो वारकरी व भाविक भक्त संत तुकाराम महाराज पालखीच्या दर्शनासाठी आकुर्डीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येत असतात. पालखी सोहळ्या येण्याआधी विठ्ठल रुक्मिणी मंदिर विठ्ठलवाडीकडून आकुर्डी मुख्य बाजारपेठ मेन रोडकडे जाणारा रस्ता लवकरात लवकर वाहतुकीसाठी (Akurdi Road Work) चालू करावा अशी मागणी दळवी यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.