Alandi Temple : आळंदी मंदिरात अभंग ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

एमपीसी न्यूज :  आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात 11 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत श्री अभंग ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. (Alandi Temple) या पारायण सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष जयंतराव देसाई यांनी केले आहे.

श्री क्षेत्र पावस येथील समाधीस्त श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या नाथ संप्रदाय परंपरेतील साक्षात्कारी श्री संत स्वामी स्वरूपानंद महाराज यांनी अभंगात अनुवाद केलेल्या श्री अभंग ज्ञानेश्वरीचा पारायण सप्ताह आळंदी  मंदिराचे सहकार्याने भक्त निवास येथील सभागृहात होत आहे. या सप्ताहाचे आयोजन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांच्या तर्फे पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

पारायण सोहळ्याची वेळ सकाळी आठ ते एक अशी आहे. या पारायण सोहळ्यात सहभागी सहभागी होण्यासाठी आळंदी ग्रामस्थ,  परिसरातील नागरिक तसेच महिला भाविक यांना नाव नोंदणी साठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Diwali bonus to police : पोलीसांनाही दिवाळी बोनस मिळावा, महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेची मागणी 

आळंदी येथील श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मठ,  श्री भैरवनाथ मंदिर,  श्री खंडोबा मंदिर, श्री राम मंदिर आवेकर भावे संस्थान, गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिर,  विश्रांतवड, (Alandi Temple) संतोषी माता मंदिर, दत्त मंदिर, धाकट्या पादुका मंदिर, वारकरी शिक्षण संस्था, अखिल भाजी मंडई मंडळ गणेश मंदिर येथील विवेक वाघमारे या ठिकाणी नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नऊ ऑक्टोबर पर्यंत नाव नोंदणी केली जाणार आहे.(Alandi Temple) अभंग पारायणासाठी पारायण प्रत उपलब्ध करण्यात आली आहे. या पारायण सप्ताह मध्ये  ज्येष्ठ नागरिकांना सुलभ होईल अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.  आळंदी पंचक्रोशीतील भाविक,  नागरिकांनी या अभंग पारायण सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन पावस येथील सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष जयंतराव देसाई यांनी केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.