Alandi News : आळंदी नगरपरिषदेच्या आयुष्यमान कार्ड वितरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज : आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत आळंदी नगरपरिषदेकडून आयोजित आयुष्यमान कार्ड वाटप विशेष शिबीरास (Alandi News) नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून दि.14 जानेवारी रोजी 1581 नागरिकांना कार्डचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणने मधील (SECC-2011 ) निकषांनुसार “आयुष्यमान भारत –पंतप्रधान जन आरोग्य योजना” (AB-PMJAY) चे पात्र लाभार्थी निश्चित करण्यात आलेले असून यात प्रत्येक परिवारातील प्रत्येक व्यक्तीला भारत सरकार कडून अधिकृत दर वर्षी 5 लाखांचा आरोग्यविमा संरक्षण दिले जाणार आहे. ज्यात त्यांना 5 लाखांपर्यंतच्या आय.सी.यु/ नॉन आय.सी.यु. मेडिकल उपचार,हॉस्पीटलायजेशन, निदान व उपचार ,राहण्याची व्यवस्था व जेवण इत्यादींचा लाभ मिळणार आहे.

Today’s Horoscope 15 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी स्वतःचे आयुष्यमान कार्ड काढून घेणे गरजेचे आहे. आळंदी नगरपरिषद हद्दीत या योजनेअंतर्गत एकूण 4529 लाभार्थी असून या सर्वांना आयुष्यमान कार्ड वितरित करण्याच्या उद्देशाने मुख्याधिकारी  कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली (Alandi News) विशेष शिबिर सुरू असून ते यशस्वी करण्यासाठी वैशाली पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी,अर्जुन घोडे, समुदाय संघटक,आरोग्य मित्र  चेतन तिकोने, जिल्हा प्रमुख पुणे व त्यांचे सहकारी तसेच महा-ई सेवा केंद्र कर्मचारी  शिंदे, सुप्रिया वैरागे हे सर्वजण विशेष प्रयत्न करत आहेत.

दि.14 रोजी 4529 पैकी 1581 नागरिकांनी नगरपरिषद कार्यालयात येऊन स्वतःचे आयुष्मान कार्ड काढून घेतले असून उर्वरित नागरिकांनी देखील आधार कार्ड, रेशन कार्ड सह नगरपरिषद कार्यालयात येऊन स्वतःचे कार्ड काढून घ्यावे जेणेकरून भविष्यात गरजेच्या वेळी 5 लाखांपर्यंत च्या मोफत वैद्यकीय उपचार सेवेचा लाभ घेणे शक्य होईल.असे आवाहन उर्वरीत नागरिकांना मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.