Alandi : ज्ञानोबा – तुकोबा महाराजांच्या जयघोषात माऊलींच्या पालखीचे पद्मावती मातेकडे प्रस्थान

एमपीसी न्यूज : सालाबाद प्रमाणे यंदाही परंपरेप्रमाणे (Alandi ) संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे माऊलींच्या मंदिरातून नवरात्र महोत्सव निमित्ताने आज (सातवी माळ) पद्मावती मंदिराकडे ज्ञानोबा – तुकाराम महाराजांच्या जयघोषात, हरिनामाच्या गजरात प्रस्थान झाले.

दुपारी पालखी पद्मावती मातेच्या मंदिरात पोहचल्या नंतर पद्मावती मातेला देवस्थान वतीने अभिषेक करण्यात आला . सभामंडपात देवी व पालखी समोर हरिभजन झाले. तसेच देवस्थान कडून भाविकांसाठी महाप्रसादाचे येथे आयोजन करण्यात आले होते.

World Cup 2023 : श्रीलंकेचा नेदरलँडवर 5 गडी राखून सहज विजय

पद्मावती माता मंदिरात देवीच्या व माऊलींच्या पालखी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पद्मावती रस्ता, विश्रांत वड (Alandi ) व वडगाव रस्ता या पालखी मार्गावर माऊलींच्या पालखी आगमनानिमित्त ठिक- ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. माऊलींच्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

पद्मावती मंदिरातून पालखीने विश्रांत वडकडे प्रस्थान केले. तिथे काही वेळ विसावा घेत वडगांव रोड वरील (अन्नपूर्णा माता नगर समोरील) भोसले निवासस्थाच्या येथे ती काही वेळ विसावली. व त्यानंतर तिने मंदिराकडे प्रस्थान केले.

यावेळी देवस्थान व्यवस्थापक माऊली वीर, माऊलींचे मानकरी, सेवेकरी, खांदेकरी, कर्मचारी वर्ग  ,ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते. तसेच आज आळंदीतील शिवतेज मित्र मंडळाच्या वतीने पद्मावती मातेला 108 नारळांचे तोरण अर्पण करण्यात आले व इतर भाविक भक्तांकडून ही नारळाचे तोरण देवीस अर्पण करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.