World Cup 2023 : श्रीलंकेचा नेदरलँडवर 5 गडी राखून सहज विजय

एमपीसी न्यूज – लखनऊ येथे श्रीलंका (World Cup 2023) विरुद्ध नेदरलँड सामन्यात श्रीलंकेने 5 गडी राखून नेदरलँडवर सहज विजय मिळवला. नेदरलँड प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 263 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने 48.2 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान गाठले.

नेदरलँडकडून सायब्रंड 70 धावा आणि वॅन बीक 57 धावा यांनी अर्धशतकी खेळी केली. श्रीलंकेच्या दिलशान मधुशंका आणि राजीथा यांनी प्रत्येकी 4 गडी बाद केले. श्रीलंकेने 263 धावांचे आव्हान 5 गड्याच्या मोबदल्यात सहज पार केले.

Pune : पुणे शहरातील वाहतुक सुविधा आणि पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य – अजित पवार

सलामीवीर पथून निसंका 57 धावा आणि सदिरा सामरविक्रमा 91 धावा आणि चारिथा असलंका 44 धावा यांच्या खेळीच्या (World Cup 2023) जोरावर 5 गडी राखून विजय मिळविला. नेदरलँडकडून आर्यन दत्त याने 10 षटकात 44 धावा देत 3 गडी बाद केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.