Alandi : अलंकापुरीमध्ये लाखो भाविक दाखल; हरीनामाच्या गजरात परिसर मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज : संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान पालखी (Alandi) सोहळ्या निमित्त आळंदीमध्ये लाखो भाविक दाखल झाले आहेत. इंद्रायणी नदी घाट वारकरी भाविक भक्तांनी फुलून गेला आहे. पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने येथील इंद्रायणी नदीपात्र जलपर्णी मुक्त करण्यात आले आहे. यामुळे इंद्रायणी नगर व ज्ञानेश्वरी मंदिर घाटावरती सुद्धा भाविक पवित्र इंद्रायणी नदी जल पात्रात स्नान करत आहेत.

Dehugaon : वारकरी संप्रदाय हा माणसांमध्ये परमेश्वर पहायला शिकवितो – चंद्रकांत पाटील

वैतागेश्वर मंदिर जवळील दर्शनबारी मंडपात वारकरी भाविकांच्या रांगा दिसून येत आहेत. प्रदक्षिणा रस्ता, वडगाव रस्ता, चाकण रस्ता इ.विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी दिसून येत होती. अलंकापुरीमध्ये दाखल झालेल्या दिंड्याचा
प्रदक्षिणा रस्त्यावर हरिनामाचा, ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष चालू झाला आहे. त्यामुळे अलंकापुरी वारकरी भक्तांनी मंत्रमुग्ध झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.