Alandi News : प्रांत अधिकाऱ्यांच्या लेखी पत्रामुळे अखेर पाचव्या दिवशी इंद्रायणी नदी प्रदूषणाचे सुटले उपोषण

एमपीसी न्यूज : गेले पांच दिवस आळंदी (Alandi News) येथे इंद्रायणी नदी प्रदूषणासाठी उपोषण करण्यात आले होते. आज अखेर पाचव्या दिवशी हे उपोषण सोडण्यात आले.

1 मे रोजी इंद्रायणी माता प्रदूषण मुक्तीसाठी साखळी उपोषणास सुरुवात झाली होती. आज महाद्वार चौकात उपोषणस्थळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे व इंद्रायणी फाउंडेशन पदाधिकारी यांची इंद्रायणी प्रदूषणबाबत बैठक झाली. केंद्रे यांचे जिल्हाधिकारी आणि प्रांतअधिकारी यांच्याशी मोबाईलद्वारे संभाषण झाले.

मुख्याधिकारी व वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितले, की 4 मे रोजी झालेल्या जिल्हाधिकारी बैठकीमध्ये इंद्रायणी माता प्रदूषण मुक्तीसाठी चाललेल्या साखळी उपोषणाची दखल घेण्यात आली आहे. या संबंधित पिंपरी चिंचवड अधिकारी यांच्याशी चर्चा देखील झाली आहे.

यावेळी उपस्थित अधिकऱ्यांना इंद्रायणी फाउंडेशन पदाधिकाऱ्यांनी पिंपरी चिंचवड व इतर ठिकाणावरून होणाऱ्या जलप्रदूषणाबाबत माहिती देण्यात आली. जलप्रदूषण (Alandi News) होणाऱ्या ठिकाणी भेट देऊन या ठिकाणी होणाऱ्या प्रदूषणाची परिस्थिति पालिका आधिकऱ्यांना दाखवण्यात आली.

अशा प्रकारे सुटले उपोषण – 

त्यानंतर प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी संबंधित विषयास अनुसरून लेखी पत्र दिले. त्यामध्ये पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली इंद्रायणी नदीमध्ये होणाऱ्या प्रदूषण संदर्भात निगडित असलेल्या सर्व यंत्रणेची संयुक्तपणे बैठक येत्या 10 दिवसात लावणात येणार आहे. सदर बैठकीची तारीख व वेळ निश्चित झाल्यानंतर इंद्रायणी फाउंडेशनला कळवण्यात येईल. तरी इंद्रायणी नदीमध्ये होणाऱ्या प्रदूषणाबाबत प्रशासन तातडीने दखल घेणार असल्यामुळे आपण इंद्रायणी नदीमध्ये होणारे प्रदूषण थांबवण्या संदर्भात सुरू असलेले साखळी उपोषण माघारी घेऊन प्रशासनास सहकार्य करावे. असे लेखी उल्लेख असल्याने हे उपोषण मंडल आधिकारी स्मिता डामसे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी लिंबू पाणी घेऊन सोडले.

यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी संबंधित विषयावर माहिती देत मनोगत व्यक्त केले. दादासाहेब करांडे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. संबंधित पत्र जाहीरपणे शिरीष कारेकर यांनी वाचून दाखवले. व पाठिंबा देणाऱ्या सर्व नागरिक संस्थांचे आभार मानले. संबंधित लढा चालूच राहील. असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Pimpri : भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त भीमशक्ती विद्यार्थी आघाडीच्या वतीने अभिवादन

यावेळी पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, पाटील साहेब, प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, दिनेश घुले, प्रकाश पानसरे, रामदास दिघे, तुकाराम माने, माऊली मुंडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.