Alandi: आळंदी नगरपरिषद मार्फत ‘सिद्धबेट’ येथे वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आळंदी नगरपरिषद (Alandi)मार्फत सिद्धबेट येथे वृक्षारोपण करण्यात आले.आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी आपल्या सहकारी अधिकारी,कर्मचारी यांच्या समवेत वृक्षारोपण केले.
यावेळी त्यांनी सिद्धबेट येथे पालिके मार्फत मागील 4,5 दिवसांपासून सुरू असलेल्या गवत काढणी मोहिमेची पाहणी करून कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.

Pune : शहरात शास्त्रीय मानकांप्रमाणे असलेले स्पीड ब्रेकर दाखवा आणि प्रति स्पीड ब्रेकर 100रुपये बक्षीस मिळवा – विवेक वेलणकर

आळंदी नगरपरिषदे मार्फत सिद्धबेट येथे वाळलेल्या झाडांची काढणी,नवीन वृक्षांची लागवड,पूर्वी लावलेल्या झाडांना खत घालून नियमितपणे पाणी देणे,परिसराची स्वच्छता या गोष्टी केल्या जात असून यामुळे या परिसरात भेट देणाऱ्या नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.