Pune News : पुणे जिल्ह्यातील ॲमेझॉन कंपनीचे डिलीव्हरी बॉय संपावर

एमपीसी न्यूज – ऑनलाईन शॉपिंग कंपनी ॲमेझॉनचे पुणे जिल्ह्यातील डिलिव्हरी असोसिएट्स, डिलिव्हरी बॉय संपावर गेले आहेत. आर्थिक व मानसिक पिळवणूकी संदर्भात आपल्या न्याय आणि हक्कासाठी हे डिलीव्हरी बॉय मागील तीन दिवसांपासून संपावर आहेत.

कामगारांच्या मागण्यांवर कंपनीने योग्य विचार करून योग्य ती अंमलबजावणी करावी. सर्व कामगारांना न्याय मिळेल असा निर्णय घ्यावा अशी विनंती डिलीव्हरी बॉय यांनी केली आहे.

या आहेत प्रमुख मागण्या 

– व्हॅन 35 रुपये (व्हेरीयबल) प्रती पार्सल करावे.

– छोटे पार्सल 20 रुपये प्रती पार्सल करावे.

– एचडी 25 रुपये प्रती पार्सल करावे.

– एस पी बायकर 20 रुपये प्रत्येकी पाहिजे.

– व्हॅन प्रोटक्टिव्हिटी 70-80 पाहिजे.

– KYC आणि MAQ ही मार्केटिंगची कामे करणार नाही.

– प्रत्येक असोसिएटला इन्शोरन्स क्लेम द्यावा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.