World Heritage : आणखी एक स्थळ युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत, गुजरात मधील हडप्पाकालीन ‘धोलावीरा’ स्थळाचा समावेश

एमपीसी न्यूज – गुजरात मधील कच्छच्या रणमधील हडप्पाकालीन शहर असलेल्या ‘धोलावीरा’ स्थळ युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. धोलाविरा: हडप्पा शहर याला जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळण्यासाठी भारताने जानेवारी, 2020 मध्ये जागतिक वारसा केंद्रात नामनिर्देशन पत्र सादर केले होते. 

2014 पासून हे स्थळ जागतिक वारसा स्थळांच्या युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीमध्ये समाविष्ट होते. धोलावीरा: हडप्पा शहर हे दक्षिण आशियातील काही मोजक्या चांगल्या संरक्षित शहरी वसाहतींपैकी एक आहे, जे इसवी सन पूर्व तिसऱ्या ते दुसऱ्या मध्य सहस्त्रकाच्या दरम्यान वसवण्यात आले आहे.

तेलंगाना राज्यात मुलुगु जिल्ह्यात पालमपेट येथील रुद्रेश्वर मंदिराला (ज्याला रामप्पा मंदिर म्हणून ओळखले जाते) भारतातील 39 वे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख मिळाल्यानंतर आता गुजरात मधील ‘धोलावीरा’ स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट भारतातील 40 वा खजिना आहे.

या यशस्वी मानांकनानाच्या माध्यमातून, भारताकडे आता एकूण 40 जागतिक वारसा स्थळे आहेत, ज्यात 32 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि एका संमिश्र स्थळांचा समावेश आहे. केंद्रीय संस्कृती मंत्र्यानी 40 किंवा त्याहून अधिक जागतिक वारसा स्थळ असलेल्या देशांचा उल्लेख केला ज्यात भारताव्यतिरिक्त यामध्ये इटली, स्पेन, जर्मनी, चीन आणि फ्रान्स यांचा समावेश आहे. जागतिक वारसास्थळांच्या यादीत 2014 पासून भारताने 10 नवीन जागतिक वारसास्थळे समाविष्ट केली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.